नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकने मागितली परवानगी


हैदराबाद – ड्रग रेग्युलेटरकडे नाकामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकने परवानगी मागितली आहे. कंपनीने पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून या लसीचा अभ्यास करण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे. सोमवारी ही माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

हैदराबादमधील कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेल्या नाकावाटे देण्यात येणारी लस ‘बीबीवी154’ च्या वापरासाठी आतापर्यंत मंजुरी दिलेली नाही. यादरम्यान भारतातील औषधी महानियंत्रक (DCGI) कंपनीद्वारे उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वापर निर्मितीपासून 12 महिन्यांच्या अवधीपर्यंत करता येऊ शकतो, अशी परवानगी देण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीसीजीआयला कंपनीने निवेदन दिले आहे आणि परवानगीच्या प्रतिक्षेत कंपनी आहे. नाकावाटे देण्यात येणारी ही लस त्या व्यक्तींना देण्यात येईल, ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत.

कंपनीकडून अर्ज मिळाल्याची पुष्टी दिल्लीतील एका सरकारी अधिकाऱ्याने केली आणि ते म्हणाले की, भारत बायोटेकने “BBV154” आणि “BBV 152” हे आधीच लसीकरण केलेल्या सहभागींना तिसरा (बूस्टर) डोस म्हणून दिल्यानंतर सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासासाठी परवानगी मागितली आहे.

भारत बायोटेकने कोरोनाविरोधात विकसित केलेली पहिली अनुनासिक (अनुनासिक स्प्रे) लसीच्या (Nasal Vaccine) दुसऱ्या ट्रायलसाठी मंजूर करण्यात आली होती. ही माहिती जैवतंत्रज्ञान विभागाने दिली होती. निवेदनात म्हटले आहे की, चाचणीचा पहिला टप्पा 18 ते 60 वयोगटातील लोकांवर करण्यात आला आहे. इंट्रानासल लस बीबीव्ही 154 आहे, ज्याचे तंत्रज्ञान सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकने विकत घेतले आहे. ही पहिलीच अशी कोरोना प्रतिबंधक लस आहे, जी भारतात मानवांवर क्लिनिकल चाचण्या करेल.