ओमिक्रॉनमुळे सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला


मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी काळा सोमवार ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शेअर बाजार सुरू होताच मोठी घसरण झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 940 हून अधिक अंकांची घसरण झाली. तर निफ्टीदेखील एक टक्क्यांनी घसरला. बाजारावर कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या, ओमिक्रॉनचे सावट आणि देशांनी लावलेले निर्बंध याचा परिणाम दिसून आला. मंदीचे सावट आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही दिसून आले.

बीएसई सेन्सेक्स शेअर बाजारच्या प्री-ओपन सेशनमध्ये 500 अंकाहून अधिक अंकाने घसरून 56,500 अंकांवर स्थिर राहिला. बाजार सुरू होताच, सेन्सेक्समध्ये 675 अंकापेक्षा अधिक घसरण झाली. तर, निफ्टीमध्येही 218.10 अंकांनी घसरून 16765 अंकावर आला. काही वेळेनंतर निफ्टीमध्ये आणखी घसरण झाली.

बाजार सुरू होताच सुरू झालेली घसरण काही वेळेनंतर सावरेल असा अंदाज होता. पण, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1035.86 अंक म्हणजे 1.82 टक्क्यांनी घसरला. एनएसई निफ्टी 32 अंकांनी 1.90 टक्क्यांनी घसरला आणि 16,662.20 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्स सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 1285.74 अंकानी घसरून 55,737 अंकावर आला होता. तर, निफ्टीमध्ये 382.65 टक्क्यांची घसरण झाली आणि 16,604 अंकावर व्यवहार करत होता.