पनामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचे समन्स


मुंबई – बच्चन कुटुंबियांच्या अडचणी पनामा पेपर लीक प्रकरणी वाढण्याची शक्यता आहे. बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने हे समन्स पनामा पेपर लीक प्रकरणी बजावल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, बच्चन कुटुंबाचेही नाव पनामा पेपर लीक प्रकरणी समोर आले होते. ईडीने तेव्हा याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे. भारतात पनामा पेपर्समध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा समावेश असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते.

हा गौप्यस्फोट इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोध मोहिमेतून झाला होता. तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा जागतिक शोध पत्रकार समूहात समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्सप्रेसचा देखील समावेश असल्याचे सांगितलं जात होते.

मागच्या वेळेस इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश करण्यात आला होता.