गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी बोटीतून जप्त केले तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन


अहमदाबाद – पाकिस्तानी मासेमारी बोट गुजरातच्या किनाऱ्यावर पकडण्यात आली असून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन या बोटमधून जप्त करण्यात आले आहे. ‘अल हुसेनी’ नावाच्या या बोटीमध्ये सहा क्रू सदस्य होते. भारतीय जलक्षेत्रात ही बोट पकडण्यात आल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने आज दिली. ही कारवाई भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या केली.

भारतीय तटरक्षक दलाने, गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, सुमारे ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन घेऊन जाणारी पाकिस्तानी मासेमारी नौका ‘अल हुसेनी’ भारतीय जलक्षेत्रात ६ कर्मचाऱ्यांसह पकडली, अशी माहिती पीआरओ डिफेन्स गुजरातने एका ट्वीटमध्ये दिली. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली होती, असे त्यात म्हटले आहे.