आयपीएल लखनौ युनायटेडचा मेंटोर बनला गौतम गंभीर

आयपीएल नवी फ्रेन्चाईजी लखनौ युनायटेडच्या मेंटोर पदी टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज आणि आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा विजयी खिताब मिळवून देणाऱ्या गौतम गंभीर यांची नियुक्ती केली गेली आहे. झिम्बाब्वेचा माजी खेळाडू अँडी फ्लॉवरची हेड कोच म्हणून नेमणूक झाली आहे. आयपीएल २०२२ सिझन सुरु होण्यास अजून पाच महिने असतानाच लखनौ टीम तयारीला लागली असल्याचे दिसून आले आहे.

४० वर्षीय गौतम गंभीर राजकारणात सक्रीय आहे. तो पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेला आहे. २००३ मध्ये टीम इंडिया मध्ये त्याने पहिला सामना खेळला होता आणि त्याच्या करियर मध्ये त्याने अनेक यादगार खेळी केल्या आहेत. २०१७ टी २० वर्ल्ड कप फायनल मध्ये त्याने पाकविरुद्ध ५४ चेंडूत फटकावलेल्या ७५ रन्स किंवा २०११ वन डे वर्ल्ड कप मध्ये लंकेविरुद्ध अंतिम सामन्यात ११२ चेंडूंत फटकावलेल्या ९७ रन्सची खेळी त्याचे चाहते विसरलेले नाहीत.

गौतमने आयपीएल टीम मध्ये अनेक टीमचे प्रतिनिधित्व केले असले तरी कोलकाता नाईट रायडर्स चा कप्तान म्हणून तो विशेष यशस्वी आहे. २०१२,२०१४ मध्ये त्याने टीमला विजेतेपद मिळवून दिले होते. भारतासाठी त्याने ५८ कसोटी, १४७ वनडे, ३७ टी २० खेळल्या असून आयपीएलमध्ये कप्तान मधून खेळलेल्या १२९ सामन्यात त्याने ७१ विजय नोंदविले आहेत. त्याने दिल्ली कॅपिटलचा कप्तान म्हणून ही जबाबदारी पेलली आहे. २०१८ च्या डिसेंबर मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.