ओप्पोच्या एन फोल्डेबल स्मार्टफोनची काही सेकंदात विक्री

ओप्पोने गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या फाईंड एन फोल्डेबल स्मार्टफोनच्या पहिल्या सेल मध्ये सर्व युनिट काही सेकंदात विकली गेली असून आता सेकंड हँड मार्केट मध्ये हा फोन १ लाख ११ हजार रुपयात विकला जात आहे असे समजते. ओप्पोचा हा पहिला फोल्डेबल फोन असून तो फक्त चीनच्या बाजारात विकला जाणार आहे. जागतिक बाजारात तो आणला जाणार नाही असेही समजते.

हा फोन तीन व्हेरीयंट मध्ये आहे. ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजची किंमत भारतीय रुपयात ९२ हजार रुपये आहे तर १२ जीबी रॅम ५१२ जीबी स्टोरेजची किंमत आहे १ लाख ८ हजार. हाच फोन रिसेल मार्केट मध्ये १ लाख ११ हजाराला विक्री केला जात आहे. २३ डिसेंबरला या फोनचा ओपन सेल आहे.

इनवर्ड फोल्डिंग डिझाईनच्या या फोनला गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन असून दोन्ही डिस्प्ले पंचहॉल डिझाईनचे आहेत. इनर डिस्प्ले ७.१ इंची आहे तर आउटर डिस्प्ले ५.४९ इंची आहे. इनर डिस्प्ले लँडस्केप मोड मध्ये असल्याने डिव्हाईस न फिरवता व्हिडीओ, गेम्स खेळणे,पुस्तके वाचणे शक्य आहे. स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ५०एमपी, १६ एमपीचे अल्ट्रावाईड लेन्स तर १३ एमपीचे टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी साठी ३२ एमपीचा कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असून तो पॉवर बटण मध्ये दिला गेला आहे.