का असतात या देशातील रस्ते निळ्या रंगाचे ?


आतापर्यंत तुम्ही रस्त्याचा रंग हा काळाच असल्याचे पाहिले असेल. मात्र एका देशात तुम्हाला रस्त्याचा रंग निळा असल्याचे पाहिला मिळेल. या देशाचे नाव कतार आहे. रस्त्याला निळा रंग देण्याची सुरूवात राजधानी दोहापासून करण्यात आली आहे.

हा रंग देण्याचे कारण कतारमध्ये दिवसेंदिवस वाढणारी ग्लोबल वार्मिंगची समस्या आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी येथील रस्त्यांना निळा रंग देण्यात आलेला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगला नियंत्रित करण्यासाठी देखील अनेक देश पावले उचलत आहे. कतारने देखील हा प्रयत्न केला आहे. कतारमध्ये 18 महिने पायलट प्रोजेक्ट चालवण्यात आला. त्यानंतर 19 ऑगस्टला शहरातील एका प्रमुख रस्त्याला निळा रंग देत कॅम्पेन लाँच करण्यात आले. कतारने परिक्षण केले की, पारंपारिक रंगाच्या जागी निळा रंग दिल्याने तापमानात किती फरक पडतो. यासाठी सेंसर्स देखील लावण्यात आले.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, निळ्या रंगाच्या कोटिंगमुळे सुर्यातून निघणारे रेडिएशन 50 टक्के कमी होतील. यासाठी रस्त्यावर निळ्या रंगाची एक मिलीमीटर थर चढवण्यात आला. इंजिनिअर साद अल दोसारीने ट्विट केले की, काळ्या रंगाच्या रस्त्यांचे तापमान वास्तविक जागेच्या तापमानापेक्षा 20 टक्के अधिक आहे. कारण काळा रंग गर्मी शोषून पुन्हा रेडिएट करतो. आता प्रश्न हा आहे की, कतारमध्ये जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतात ही अशा प्रकारे प्रयोग केला जाऊ शकतो का ?

Leave a Comment