600 वर्ष जुन्या घरात आहे जगातील सर्वात लहान संग्रहालय


तुम्ही जगभरातील अनेक विविध प्रकारची संग्रहालये पाहिली असतील. असेच एक खास संग्रहालय स्विर्त्झलँडमध्ये आहे. ‘हुसेसअग म्युझियम’ हे स्विर्त्झलँडमधील व त्याचबरोबर जगातील सर्वात छोटे संग्रहालय आहे. हुसेआग म्युझियमचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘पँट पॉकेट म्युझियम’ असा होता.

हे संग्रहालय बघण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत, आता कोणत्याही प्रकारची नोंदणी करावी लागत नाही. याचे कारण हे संग्रहालय 600 वर्ष जुन्या घराच्या दरवाजाच्या काचेच्या खिडकीमध्ये बनवण्यात आलेले आहे. बॅसेलच्या जुन्या शहरातील अरूंद रस्त्यावरून चालत गेले की, ही घर आहे.

Posted by Hoosesaggmuseum on Sunday, January 6, 2019

प्रत्येक महिन्याला या खिडकीमध्ये नवनवीन वस्तू प्रदर्षणासाठी ठेवण्यात येत असतात. मागील 35 वर्षांपासून वेर्जेट कुटुंब या घरात राहत असून, 24 वर्षांपासून ते हे संग्रहालय चालवत आहेत. संग्रहालयातील अनेक वस्तू या घरात राहणाऱ्या पती-पत्नींच्याच साठवलेल्या असतात. मात्र इतरांनी दिलेल्या वस्तू देखील या छोट्या संग्रहालयात ठेवण्यात येतात.

घरातील डॅगमर या संग्रहालयाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळतात. तर त्यांचे पती मॅथिस हे क्रिएटिव्ह भाग बघतात.

डॅगमर यांना लहानपणापासूनच वस्तूंचा संग्रह करण्याची सवय आहे. त्याच्या रूममध्ये देखील घड्याळे, प्लॅस्टिकचे गॉग्लस, टी इग्स, खेळणी, बेल्स, राजांचे कलेक्शन अशा विविध गोष्टींचा संग्रह आहे.

Leave a Comment