या बेटावर जाऊ शकत नाही महिला


जगभरात अनेक ठिकाणं ही वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिध्द आहेत. असेच एक  ठिकाण जापानमध्ये देखील आहे. या जागेचे नाव ओकिनोशिमा आयलँड असे आहे. या आयलँडवर महिलांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. एवढेच नाही तर पुरूषांना जाण्यासाठीही अनेक कडक नियम बनवण्यात आले आहे.

ओकिनोशिमा आयलँडला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. 700 वर्ग मीटरमध्ये पसरलेल्या या आयलँडबद्दल सांगितले जाते की, चौथ्या ते नवव्या शतकात हे कोरियाचे प्रायद्वीप आणि चीनमधील व्यापार केंद्र होते.

या आयलँडला धार्मिक रूपाने अधिक पवित्र समजले जाते. अनेक काळापासून सुरू असलेल्या काही धार्मिक मान्यता आजही या आयलँडवर मान्य केल्या जातात, ज्यामुळे महिलांना येथे येण्यास बंदी आहे.

सांगण्यात येते की, या आयलँडवर येणाऱ्या आधी पुरूषांना निर्विस्त्र होऊन आंघोळ करावी लागते. येथील नियम एवढे कठोर आहेत की, वर्षातून केवळ 200 पुरूष या आयलँडवर जातात.

जे लोक या आयलँडवर जातात, त्यांना सख्त सुचना देण्यात येते की, तेथील कोणतीही गोष्ट सोबत घेऊन जाऊ शकत नाही. याशिवाय त्यांना हे देखील सांगण्यात येते की, या यात्रेबद्दल कोणाला काहीही सांगू नये. तेथून परतणारे लोक आपल्याबरोबर गवत देखील घेऊन जाऊ शकत नाही.

या आयलँडवर मुनाकाता ताइशा ओकित्सू मंदिर आहे. जेथे समुद्राच्या देवीची पुजा केली जाते. 17 व्या शतकात येथे जहाजांच्या सुरक्षेसाठी देखील पुजा केली जात असे.

Leave a Comment