इंग्रजांच्या तोफेचे गोळेही या किल्ल्यासमोर निष्क्रिय


भारतातील अनेक किल्ले वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द आहेत. एक असाच किल्ली राजस्थानच्या भरतपूर येथे आहे. या किल्ल्याला लोहगड (लोहागड) चा किल्ला असे म्हटले जाते. या किल्ल्याला भारतातील एकमात्र अजेय दुर्ग म्हटले जाते. कारण हा किल्ला कधीच कोणीच जिंकू शकले नाही. इंग्रजांनी देखील या किल्ल्यासमोर शरणागती पत्करली होती.

या किल्ल्याची निर्मिती 285 वर्षांपुर्वी म्हणजे 19 फेब्रुवारी 1733 ला जाट शासक महाराज सूरजमल यांनी केली होती. त्याकाळी तोफा आणि बारूदचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे, त्यामुळे किल्ला बनवतानाच एक विशेष प्रयोग करण्यात आला. ज्यामुळे तोफेचे गोळे देखील किल्ल्याच्या भिंतीला लागून निष्क्रिय ठरत असे.

या किल्ल्याच्या निर्मितीवेळी आधी एक रूंद आणि मजबूत दगडांची भिंत बांधण्यात आली. या भिंतीवर तोफेच्या गोळ्यांचा परिणाम होऊ नये म्हणून भिंतीच्या चारही बाजूला शेकडो फूट रूंद कच्च्या मातीची भिंत उभारण्यात आली आणि खाली एक खोल खड्डा बनवून त्यात पाणी भरण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये शत्रु पाण्याने भरलेला खड्डा पार करून आला तरी देखील सपाट भितींवर चढणे अशक्य आहे.

या किल्ल्यावर आक्रमण करणे एवढे सोपे नव्हते. तोफेच्या गोळेला चुन्याच्या भिंतीत अडकायचे व त्याची आग तेथेच विझत असे. यामुळे किल्ल्याला कोणतेही नुकसान होत नसे. यामुळेच शत्रु या किल्ल्यात कधीच प्रवेश करू शकला नाही.

सांगण्यात येते की, हा किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी 13 वेळा आक्रमण केले. मात्र त्यांना एकदाही हा किल्ला जिंकता आला नाही. वारंवार हार पत्करावी लागल्याने इंग्रज देखील हताश झाले.

ब्रिटिश इतिहासकार जेम्स टाड यांच्यानुसार, या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे याच्या मातीपासून बनलेल्या भिंतीच होत्या. एकाही शत्रुला हा किल्ला कधीच जिंकता आला नाही.

Leave a Comment