मच्छरांपासून बचाव करणार ही खास कपडे


मच्छरांमुळे जगभरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. मच्छरांपासून बचाव करण्यासाठी संशोधकांनी ग्रॅफीन लाइन नावाचे कपडे परिधान करण्याचा विकल्प सुचवला आहे. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार, 2016 मध्ये मलेरियामुळे 4,45,000 लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिवर्सिटीमधील वैज्ञानिकांनी सांगितले की, ग्रॅफीनपासून बनलेल्या कपड्यांचा वापर केल्याने मच्छर चावणे कमी होतात. यामुळे मलेरिया होण्याची देखील भिती नसते.

मच्छरांचा डंख हे कपडे भेदू शकत नाहीत. हे कापड सामान्य कापडापेक्षा अधिक पातळ व मजबूत आहे. मनुष्याच्या शरीराच्या वासाने आकर्षित होत मच्छर चावतात. या कपड्यांमुळे शरीराचा गंध रोखला जातो.

हे कपडे तयार करणारे प्रोफेसर रॉबर्ट हर्ट म्हणाले की, आम्ही ग्रॅफीनच्या मदतीने कपडे बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, जे विषारी रसायनांच्या विरोधात कवच म्हणून काम करेल.

वैज्ञानिकांनी या साठी प्रयोग देखील करून बघितला. मच्छरांनी भरलेल्या रूममध्ये एका व्यक्तीला बसवून त्याच्या एका हाताला ग्रॅफीनने झाकले तर दुसरा हात साध्या कपड्याने झाकला. साध्या कपड्यावर मच्छर बसत होते, डंख मारते होते. तर ग्रॅफीन असलेल्या हातावर एक-दोनच मच्छर बसले होते. हा पदार्थ महाग असल्याने यापासून बनलेले कपडे देखील महाग असतील.

ग्रफीन हा पातळ कार्बन परमाणू पासून बनलेला पदार्थ असून, 2014 मध्ये मॅनचेस्टर येथील वैज्ञानिकांनी याचा शोध लावला होता. हे जगातील सर्वात पातळ, हलके व मजबूत मटेरियल आहे

Leave a Comment