या ठिकाणी अजूनही भरतो स्वयंवर मेळा


प्राचीन भारतात युवतीचा विवाह स्वयंवर ठेऊन करण्याची प्रथा होती. स्वयंवर म्हणजे उपस्थित तरुण लोकांच्या मधून उपवर मुलीने तिच्या पसंतीचा वर निवडायचा. आता ही परंपरा जवळजवळ संपुष्टात आली असली तरी गुजरातच्या सौराष्ट भागात तरणेतर येथे ही परंपरा आजही सुरु आहे. त्यानिमित्ताने येथे दरवर्षी स्वयंवर मेळा भरतो. प्रामुख्याने आदिवासी जनता यात सामील होते. या मेळ्यासाठी आदिवासी तरुण तरुणी नटून थटून आपला जीवनसाठी शोधण्यासठी येतात.


धानगड तरणेतर येथे भरणाऱ्या या मेळ्याचा संबंध महाभारत काळाशी जोडलेला आहे. द्रौपदीचे स्वयंवर झाले आणि अर्जुनाने पण जिंकला तेव्हा द्रौपदीने पांडवांशी विवाह केला या कथेचा त्याला संदर्भ आहे. हा मेळा या भागात लोकप्रिय आहे. यात युवक पारंपारिक कपडे परिधान करून स्वतः विणलेल्या रंगीबेरंगी छत्र्यांखाली बसतात आणि मुलींची प्रतीक्षा करतात. युवती सुद्धा पारंपारिक वेशभूषेत असतात आणि आपल्याला कोणता जोडीदार योग्य वाटतो त्याची परीक्षा करतात. पसंती झाली कि दोन्ही बाजूचे परिवार एकमेकांची बोलणी करून विवाह निश्चित करतात.

या मेळ्यासाठी गुजरातच्या विविध भागातून लोक हजर असतात. त्यामुळे येथे पारंपारिक पोशाखांचे सुंदर दर्शन घडते तसेच मेळ्यात जनावरे प्रदर्शन, खेळांचा स्पर्धा सुद्धा होतात. त्रिनेश्वर मंदिराजवळ हा चार दिवसांचा मेळा भरतो. यंदा तो १ सप्टेंबरला सुरु झाला असून ४ सप्टेंबर पर्यंत आहे.

Leave a Comment