पाकिस्तानी वाहिनीला दिलेला मुलाखतीत सानिया मिर्झाने उघड केले शोएब मलिकचे गुपित


पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा या जोडीची कायम चर्चा असते. अत्यंत शांत स्वभावामुळे शोएब मलिक क्रिकेटच्या मैदानात चर्चेत आहे. पण हे सानिया मिर्झा हिला मान्य नाही. शोएब मलिक दिसतो तितका शांत नसल्याचे तिने पाकिसानी वाहिनीला मुलाखत देताना सांगितले. शोएबला अँकरने विचारले, तुमच्या पत्नीचा वाढदिवस तुम्ही एक-दोनदा विसरला, तर तिच्याकडून काय प्रतिक्रिया येते? शोएब म्हणाला, अशी प्रतिक्रिया एकदा येत नाही. अँकरने विचारले, नेमके असे का होते? ‘

काही गोष्टी जेव्हा तिच्या आवडीच्या होत नाही, तेव्हा तिची रिअॅक्शन येते. या अडथळ्यातून रोज जावे लागते. सानिया यावर हसत म्हणाली, हो, हे खरे आहे. त्यानंतर शोएब म्हणाला, मी माझा वाढदिवसही विसरतो. सानिया मिर्झा तेव्हा म्हणाली, तू तसाच आहेस. तू तुझा विसरलास, मला त्याची पर्वा नाही, पण तू माझा वाढदिवस कसा विसरलास? शोएब म्हणाला, बर्थडे विसरणे ही मोठी गोष्ट आहे का?

दरम्यान, शोएबने सानिया खोटे बोलत नसल्याचे सांगितले. होय, सोशल मीडियावर पोस्ट टाकताना ती नक्कीच गोष्टी लपवते. यावर सानिया म्हणाली, मी असे म्हणत नाही की मी खोटे बोलत नाही, परंतु मी नेहमी खोटे न बोलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर अँकरने सानियाला विचारले, शोएब वाटतो तितका साधा आहे का?, हे खरे आहे का?’ सानिया म्हणाली, तो अजिबात साधा नाही.