ब्रेस्ट ट्रान्सप्लांटसाठी मिया खलिफाने खर्च केले तब्बल एवढे लाख


मिया खलिफाला सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून ओळखले जाते. सध्या सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर म्हणून मिया खलिफा जगभरामध्ये ओळखली जाते. ती पॉर्न इंडस्ट्रीपासून सध्या दूर असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकताच टीक-टॉकवर एक व्हिडीओ मियाने शेअर केला आहे. मियाने या व्हिडीओत तिचे स्तन हे बनावट असल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे ब्रेस्ट ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी तिने लाखो रुपये खर्च केल्याचेही तिने सांगितले आहे.

सध्या मिया खलिफाचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. बुधवारी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत ती तिच्या होणाऱ्या मुलीसोबत संवाद साधताना दिसत आहे. मिया ही २८ वर्षांची असून तिची होणारी मुलगी यात तिला तिच्या सौंदर्याबद्दल, शरीराबद्दल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे.

तिची होणारी मुलगी यावेळी तिला म्हणते, आई मला मोठे झाल्यावर अगदी तुझ्यासारखे दिसायचे आहे. मिया यावर उत्तर देताना म्हणते, तुला जर आईसारखे दिसायचे असेल आणि तिच्यासारखे सौंदर्य हवे असेल, तर तुला लाखो रुपये खर्च करावे लागतील. तुझ्या आईने तिच्या स्तनासाठी १३ हजार डॉलर म्हणजेच जवळपास ९ लाख ९० हजार रुपये खर्च केले आहेत. तर नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी १५ हजार डॉलर म्हणजेच ११ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे तू आतापासूनच बचत करायला सुरुवात कर, असा सल्ला मियाने दिला.

मिया खलिफाने या व्हिडीओत तिचे स्तन खोटे असल्याचा अप्रत्यक्षरित्या खुलासा केला आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मियाचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे. तसेच अनेकांनी मियाचे स्तन बनावट असल्याचे माहित नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान तिच्या या खुलाशानंतर अनेकजण तिला तू स्तन आणि नाकाच्या शस्त्रक्रियेवर एवढा खर्च कसा केलास? असा प्रश्न विचारत आहे. काही वर्षांपूर्वी तिने स्वत:च याबाबत खुलासा केला होता. तर तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, मी केवळ पॉर्न फिल्म्समधून १२ हजार डॉलर्स (९ लाख रुपये) कमावले होते.

मियाने २०१४-१५ दरम्यान तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केले होते. तीन महिन्यांच्या या कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी आपल्यावर पॉर्नस्टार असल्याचा ठपका बसल्याची खंत तिने या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली होती. या क्षेत्रात मी वयाच्या २१ व्या वर्षी आले. त्यावेळी हे व्हिडीओ एवढे लोकप्रिय होतील, असे मला वाटले नव्हते. हे माझे एक डर्टी सिक्रेट असेल असे मला वाटलेले. कारण या क्षेत्रात अनेक तरुणी काम करतात, पण प्रत्येकीला लोक ओळखत नाहीत. दुर्देवाने माझ्याबद्दल तसे झाले नाही. ते क्षेत्र सोडून आज मला चार वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तरी लोक मला पॉर्नस्टार म्हणूनच ओळखतात. माझ्या घरच्यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवलेले नसल्याची खंत मियाने बोलून दाखवली.