भारतीय कोविड लस प्रमाणपत्राला १३३ देशांची मान्यता

केंद्र सरकारने गुरुवारी भारतीय कोविड लस प्रमाणपत्राला जगातील १३३ देशांची मान्यता मिळाल्याचे जाहीर केले आहे. त्यातील अनेक देशांनी लस प्रमाणपत्र परस्पर मान्यतेसाठी भारताबरोबर करार केले आहेत तर बाकीचे देश पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी देशाच्या प्रोटोकॉल नुसार नियम ग्राह्य धरत आहेत. विदेश मंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

विदेश मंत्री जयशंकर म्हणाले, सरकार भारतीयांचा परदेश प्रवास सुलभ व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. काही देशात क्वारंटाइन आणि प्रवेशासंदर्भात असलेले नियम त्यात बाधा ठरत आहेत. पण कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, पर्यटक आणि परिवारासह परदेशी जाणारे प्रवासी यांच्या साठी सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारताच्या सिरम लाईफ सायन्सेस तर्फे दिल्या जाणाऱ्या ५ कोटी पौंड म्हणजे ५.०७ अब्ज रुपये देणगीतून तेथे नवे ‘पूनावाला वॅक्सिन संधोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सिरम लाईफ सायन्सेसची पूर्ण मालकी पूनावाला परिवाराकडे असून अदार पूनावाला त्याचे सीईओ आहेत. या केंद्रात सर्व प्रकारच्या लसींवर संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.