आयुष्मानला करायची आहे नीरज चोप्राची बायोपिक

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची ओळख हटके चित्रपट अभिनेता अशी आहे. त्याचा ‘चंदिगढ करे आशिकी’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. त्याच्या चित्रपटातून काही तरी सामाजिक मुद्दा आणि त्याला अनुसरून काही संदेश दिला जातो. पण आता आयुष्मानला बायोपिक करायची आहे. आणि विशेष म्हणजे त्याला भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांच्या बायोपिक मध्ये काम करण्याची इच्छा आहे.

या संदर्भात एका मुलाखतीत आयुष्मान म्हणाला, ‘मी नेहमीच खऱ्या आयुष्यातील हिरो मुळे प्रेरित होतो. सध्या माझ्यावर नीरज चोप्राचा खूप प्रभाव आहे. बॉलीवूड मध्ये सध्या खूप बायोपिक बनत आहेत. नीरज वर बायोपिक बनत असेल तर मला त्याची भूमिका करणे खूप आवडेल. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये नीरजने जी जिद्द, परिश्रम करून पराक्रम केला, त्याला सलाम करणे गरजेचे आहे. अर्थात याच्या बायोपिक मध्ये तो स्वतःच भूमिका करणार नसेल तर मी ते काम करेन.’ असे पराक्रम सिनेमच्या पडद्यावर दाखविले जायलाच हवेत.

नीरज चोप्रा याला सुद्धा वारंवार त्याच्यावर बायोपिक करण्याबाबत प्रश्न विचारले गेले आहेत. मात्र नीरजने बायोपिक आत्ताच नको असे मत व्यक्त केले आहे. निरजच्या म्हणण्यानुसार त्याच्या करियरची ही फक्त सुरवात आहे. अजून तो खेळतो आहे आणि अजून बरीच मेडल त्याला मिळवायची आहेत. तेव्हा तो खेळातून निवृत्त होईल तेव्हा त्याची बायोपिक बनणे अधिक योग्य ठरेल.