शीना बोरा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा ; शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा


मुंबई – एक धक्कादायक खुलासा देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीने हा खुलासा केला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला लिहिलेल्या एका पत्रातून केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये एका महिलेने पाहिले असल्याचा दावा तिची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीने केला आहे. सीबीआयला भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीने पत्र लिहिले असून काश्मीरमध्ये शीनाचा तपास करण्याची विनंती इंद्राणी मुखर्जीने केली आहे.

इंद्राणीने पत्रासोबतच विशेष सीबीआय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात 2015 पासून शीनाची आई आणि मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात बंद आहे. गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर इंद्राणी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.