झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्काच्या जागी ‘या’ अभिनेत्रीची वर्णी


बराच काळापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शाहरुख खानसोबत ती अखेरची ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. पण अनुष्काचा अभिनय पाहण्यासाठी मात्र तिच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. लवकरच महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा काम करणार असल्याचे बोलले जात होते. पण आता या चित्रपटात ती दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार नाही. या प्रोजेक्टमध्ये मागच्या काही महिन्यामध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. त्यानुसार आता अनुष्का फक्त या चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमचा भाग असणार आहे. तर आता या बायोपिकमध्ये अनुष्काच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरीला घेतल्याचे बोलले जात आहे. २०२२च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

सुरुवातीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय तृप्तीला या चित्रपटासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर तिचे ट्रान्सफॉर्मेशन केले जाणार आहे आणि यासाठी तिला काही महिन्याचे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. या प्रशिक्षणाच्याच कारणांमुळे अनुष्काने या चित्रपटाला नकार दिल्याचे बोलले जाते.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रॉसित रॉय सांगतात, अनुष्काला मुलगी वामिकाच्या जन्मानंतर कोणत्याही प्रकारचे हेवी वर्कआऊट करायचे नसल्यामुळेच तिने या चित्रपटाला नकार दिला. ती सध्या हलक्या- फुलक्या विनोदी किंवा रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करत आहे. यासोबतच तिला आई म्हणून स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत.