व्हॉटस अप ने महाराष्ट्र, कर्नाटकातील ५०० गावे घेतली दत्तक
व्हॉटस अप ने त्याच्या प्रायोगिक प्रकल्पानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ५०० गावे दत्तक घेतली आहेत. मेटाच्या स्वामित्वाखालील व्हॉटस अप ने बुधवारी या संदर्भातील घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील स्मार्टफोन युजर्सना डिजिटल पेमेंट प्रणालीची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला गेल्याचे व्हॉटस अपचे म्हणणे आहे. हा कार्यक्रम डिजिटल पेमेंट उत्सव नावाने सुरु झाला असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ५०० खेडी कव्हर केली जाणार आहेत.
भारतात मेटा, म्हणजे फेसबुक व अन्य सोशल प्लॅटफॉर्मची पेरंट कंपनीने त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात त्यांच्या अॅप्स मध्ये सामाजिक, आर्थिक परिवर्तन व समाजावर त्याचा होत असलेला सकारात्मक परिणाम दाखविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे ठेवला आहे. याचा उद्देश तळागाळापर्यंत डिजिटल पेमेंट सिस्टीम पोहोचविणे हा आहे. किराणा मालापासून ब्युटी पार्लर पर्यंत सर्व छोटे, मध्यम व्यवसाय व्हॉटस अप डिजिटल पेमेंट सिस्टीमचा वापर करू शकणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरवात कर्नाटकातील कत्थनहळळी गावापासून केली गेली आहे. गावकर्यांना डिजिटल पेमेंट म्हणजे काय, ते करताना कोणती काळजी घ्यावी, त्यातील धोके, फायदे, सुरक्षा या सर्व पैलूंची माहिती करून दिली जात आहे असे सांगितले जात आहे.