विश्वसुंदरी हरनाजची इतकी आहे कमाई
भारताला २१ वर्षानंतर विश्वसुंदरी खिताब जिंकून देऊन हरनाज संधूने देशाचे नाव रोशन केले आहे आणि तिच्या नावाची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. हरनाजला आज जगभर प्रसिद्धी मिळाली असली तरी सर्वसामान्य मॉडेल पासून जागतिक सेलेब्रिटी असा तिचा प्रवास शानदार झाला आहे. हरनाज विषयी आता गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात असून तिचा जन्म, शिक्षण, कमाई या संदर्भात सर्च होत असल्याचे दिसून आले आहे.
हरनाज विश्वसुंदरी बनून जागतिक सेलेब्रिटी बनली हे खरे असले तरी तिच्या नावावर यापूर्वी सुद्धा अनेक खिताब जमा आहेत. पंजाबच्या गुरुदासपूर मध्ये जन्मलेल्या हरनाजने सरकारी मुलींच्या कॉलेजमधून पदवी घेतली आहे. तिची लाईफस्टाईल अगोदर पासून लॅव्हीश आहे. मिस इंडिया चंदिगढ २०१७, मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८, फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ असे खिताब तिच्या नावावर आहेत.
हरनाज बराच काळ मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. मिडिया रिपोर्ट नुसार हरनाजची २०१७ मधली कमाई १० लाख डॉलर्स होती ती २०२१ मध्ये ५० लाख डॉलर्स म्हणजे ३८ कोटींवर गेली आहे. मॉडेलिंग करून ती दरमहा लाखो रुपये मिळविते पण ब्रांड एंडोर्समेंट मधूनही ती प्रचंड पैसा मिळवते. चंडीगड मध्ये हरनाज तिच्या आईवडिलांसोबत राहते. तिच्या दागिने आणि डिझायनर्स कपड्यांची किंमत लाखो रुपये आहे.
बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार आणि क्रिकेट मध्ये विराट कोहली हरनाजचे फेव्हरीट आहेत.