बंगालच्या दुर्गा पूजेला युनेस्कोने दिले सांस्कृतिक वारसा यादीत स्थान
बुधवारी युनेस्कोने बंगालच्या दुर्गा पूजा उत्सवाला सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिल्याचे जाहीर केले आहे. युनेस्कोने ट्वीटर वर दुर्गा मूर्तीचा फोटो पोस्ट करून कोलकाता येथील दुर्गा पूजा आत्ताच अमूर्त परंपरेत सामील केली गेल्याचे जाहीर करून भारताला त्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. युनेस्कोच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी सर्व भारतीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे सांगताना दुर्गा पूजा उत्सवाचा अनुभव सर्वांजवळ हवा असे म्हटले आहे.
बंगाल सरकारने युनेस्को कडे या उत्सवाला सांस्कृतिक वारसा परंपरा म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला होता त्याला युनेस्कोने मान्यता दिली आहे. बंगाल मध्ये दरवर्षी हा उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि सर्व धर्माचे, श्रीमंत गरीब सर्व लोक त्यात मोठ्या भक्तीभावाने सामील होतात. आता तर बंगाल बाहेर अनेक राज्यात सुद्धा हा उत्सव केला जातो. बंगाल राज्य संस्कृती आयोगा अध्यक्ष सुवप्रसन्न म्हणाले, दुर्गा पूजा पांडाल निर्मिती शिल्प कौशल्य प्रदर्शित करणाऱ्या रेड रेड कार्निव्हलने जगभरातील लोकांत जागृती केली आहे. त्यामुळे जगभर आता दुर्गा पूजा माहिती झाली असून अनेक विदेशी हा उत्सव पाहण्यासाठी आवर्जून बंगालला भेट देतात.