हातोहात विकली गेली बीएमडब्ल्यूची आयएक्स ईव्ही
जर्मन लग्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यूने सोमवारी भारतात पूर्ण इलेक्ट्रिक एसयुव्ही आय एक्स सादर केली असून तिला भारताच्या ऑटो मार्केट मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या कारची बेस प्राईज १.१६ कोटी आहे. पण भारतात या कारची पहिली बॅच अक्षरशः चणेफुटण्यासारखी हातोहात विकली गेली आहे. मंगळवारी कंपनीने आयएक्स ईव्हीच्या पहिल्या बॅचची पहिल्याच दिवशी पूर्ण विक्री झाल्याचे जाहीर केले आहे. या एसयुव्ही ची डिलिव्हरी एप्रिल २०२२ पासून दिली जाणार आहे.
कंपनीने कळविल्यानुसार दुसऱ्या बॅचचे बुकिंग २०२२च्या पहिल्या तिमाहीत सुरु केले जात आहे. आयएक्स ईव्ही ड्राईव्ह ४० व्हेरीयंट साठी दिलेल्या बॅटरी पॅकच्या एका सिंगल चार्ज मध्ये ४१४ किमी तर एक्स ड्राईव्ह ५० व्हेरीयंट मध्ये सिंगल चार्ज मध्ये ६११ किमी अंतर कापता येईल असा कंपनीचा दावा आहे. या व्हेरीयंटस साठी फास्ट चार्जिंग ऑप्शन दिला गेला आहे. इलेक्ट्रिक आर्कीटेक्चर मुळे आतील स्पेस वाढली आहे.
या एसयुव्हीने अॅडल्ट ओक्यूपेंट प्रोटेक्शन टेस्ट पास केली आहे तसेच मागच्या भागात चाईल्ड ओक्यूपेंट प्रोटेक्शन आहे त्यामुळे साईड आणि पुढच्या बाजूने सुद्धा अधिक सुरक्षा मिळते असे सांगितले जात आहे. सध्या कार खरेदीवर कंपनीकडून आईएक्स वॉल बॉक्स चार्जर दिला जात आहे. भारतातील ३५ शहरात डीलर नेटवर्कवर सर्व जागी टच पॉइंटवर फास्ट चार्जर लावले जात आहेत. या एसयूव्हीचे हेग्झागोनल स्टीअरिंग व्हील आकर्षक असून मोठा डिस्प्ले, फ्लोरिंग सेंटर कन्सोल मुळे वेगळीच शान आली आहे.