मिस युनिवर्स हरनाजचा विनिंग गाऊन डिझाईन करणारी साईशा खास चर्चेत

२१ वर्षाच्या कालखंडानंतर यंदाच्या वर्षी जगप्रसिद्ध मिस युनिव्हर्स सौदर्यस्पर्धेत विजयी ठरलेली भारताची सुंदरी हरनाजने देशाची शान उंचावली आहे. तिच्या या यशाची चर्चा जगभर सुरु आहेच पण त्याचबरोबर अंतिम फेरीत तिने परिधान केलेल्या खास गाऊनची डिझायनर, साईशा शिंदे हिचेही नाव सोशल मिडीयावर झळकू लागले आहे. साईशाने डिझाईन केलेल्या या ‘ विनिंग गाऊन’ ला जगभरातून पसंती मिळाली आहेच पण अन्य एका कारणाने सुद्धा साईशा चर्चेत आली आहे.

हरनाज मिस युनिव्हर्स बनल्यावर साईशाने एक फोटो शेअर केला आहे. त्या खाली कॅप्शन मध्ये ती म्हणते,’ आम्ही करून दाखविले, आता तुम्हा सर्वाना भेटायला उत्सुक आहोत. साईशा मूळची स्वप्नील शिंदे. तिने सेक्स चेंज करून घेतल्याची माहिती जानेवारी मध्ये दिली होती आणि आता ती ट्रान्सवूमन असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळची तिची पोस्ट खूप व्हायरल झाली होती.

त्या पोस्ट मध्ये साईशाने आपल्या मनाची वेदना स्पष्ट केली होती. त्यावेळी स्वप्नील शिंदे अशी ओळख असलेल्या साईशाने लिहिले होते,’ अखेर हिम्मत केली. खऱ्याचा स्वीकार केला आहे. काही वर्षांपूर्वी मला कळले कि आपल्याला पुरुषांविषयी आकर्षण वाटते आहे. आपण गे आहोत. पण सहा वर्षापूर्वी मी सत्याच्या स्वीकार केला. जेन्डर चेंज करून आता मी ट्रान्सवूमन आहे.’ साईशाने यापूर्वी करीना कपूर, कतरिना, दीपिका, अनुष्का, हीना खान, सनी लीयोनी अश्या अनेकांसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत.. हरनाजसाठी तिने बनविलेला विनिंग गाऊन पंजाबी फुलकारीच्या उत्कृष्ट नमुना आहे आणि त्याला खास देशी लुक दिला गेला आहे.