ऑस्ट्रलिया पंतप्रधान स्कॉट मॉरीसन करोना पॉझीटीव्ह

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांची करोना चाचणी पॉझीटीव्ह आली असल्याचे वृत्त असून मंगळवारी त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी स्कॉट, सिडने मधील एका शाळेतील पदवीदान कार्यक्रमात सहभागी झाले होते तेथे सुमारे १ हजार लोक उपस्थित होते. त्यानंतर दोन वेळा स्कॉट यांची करोना चाचणी केली गेली मात्र दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले होते.

स्कॉट एका करोना संक्रमिताच्या सहवासात आले होते असे सरकारी सूत्रांकडून सांगितले जात आहे. करोनाची सुरवात झाल्यापासूनच ऑस्ट्रेलियाने कडक लॉकडाऊन लावला होता आणि बाहेरील देशातून येणाऱ्याना देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. करोनाच्या सर्व लाटांमध्ये देशात कडक निर्बंध घातले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर देशात करोना केसेस पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनचा ऑस्ट्रेलियात प्रवेश झाला आहे मात्र पंतप्रधान स्कॉट यांनी हे व्हेरीयंट फार गंभीर नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. डिसेंबरच्या सुरवातीपासून परदेशी व्हिसा होल्डरना देशात येण्यास परवानगी दिली गेली आहे.