करीना कपूरला झाला करोना

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तिची जिवलग मैत्रीण अमृता अरोरा या दोघींची करोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने दोघींना घरीच आयसोलेशन मध्ये राहावे लागले आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाचा धोका कमी झाला असला तरी तो पूर्ण टळलेला नाही. महाराष्टात करोनाची दुसरी लाट फार विध्वंसक होती आणि तिचा परिणाम अजूनही आहेच. त्यातच आता कोविडचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोन महाराष्ट्रात पोहोचले आहे. अश्या परिस्थितीत या दोन अभिनेत्री करोना पॉझीटीव्ह आल्या आहेत आणि त्या सुपरस्प्रेडर असण्याची शक्यता असू शकते.

या दोघी ९ डिसेंबर रोजी अनिल कपूर यांची कन्या रिया हिने दिलेल्या पार्टी मध्ये सहभागी होत्या आणि त्यानंतर त्या करण जोहर यांच्या पार्टी मध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या काळात त्या अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत. अनेक कलाकारांना सुद्धा त्या भेटल्या आहेत. यामुळे बीएमसीने ट्रेसिंग सुरु केले असून आज आणखी काही बॉलीवूड कलाकारांचे चाचणी रिपोर्ट अपेक्षित आहेत. या दोघीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आरटीपीसीआर करून घ्यावी असे आवाहन केले गेले आहे. पार्टी मध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींचे डीटेल्स तपासले जात आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रोनचे १७ रुग्ण सापडले असून त्यातील ८ बरे झाले आहेत. मात्र तरीही ओमिक्रोनचा फैलाव अतिशय वेगाने होत असल्याने जनतेने गाफील राहू नये, करोना नियमावलीचे काटेखोर पालन करावे असे आदेश बीएमसीने जारी केले आहेत.