अमेरिकेचे डिझाईन ढापून चीनने बनविले अतिवेगवान विमान

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एक तासात पोहोचता येईल असे हायपसॉनिक विमान चीनने तयार केले असून २०२५ पासून ते प्रवासासाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. या विमानाचा वेग ताशी १२ हजार किलोमीटर असेल. अर्थात या विमानाचा मूळ आराखडा अमेरिकेच्या नासा मधील चीफ इंजिनीअर मिग हन टंगस यांनी १९९० च्या दशकात बनविला होता मात्र त्यावेळी अशी विमाने बनविणे फार खर्चिक असल्याचे कारण देऊन अमेरिकन सरकारने  तो रिजेक्ट केला होता. आता चीनने त्याचाच वापर करून असे विमान बनविले आहे.

नवनवीन शोध आणि दुसऱ्यांनी लावलेल्या शोधांची कॉपी मारून नवनवीन वस्तू बाजारात आणणे ही चीनची खासियत आहे आणि त्यामुळे चीन जगात बदनाम सुद्धा आहे. करोना ही चीनचीच देणगी असल्याचा दावा केला जात आहेच पण चीनने हा दावा फेटाळून नवे नवे संशोधन सुरूच ठेवले आहे. आत्ता पाहता पाहता नजरेसमोरून अदृश होणारे विमान हा त्याचा नवा पुरावा आहे. या विमानाचा प्रोटोटाईप फोटो शेअर केला गेला आहे. या विमानाचे डेल्टा विंग्स सर्वसामान्य विमानापेक्षा वेगळे आहेत. एरोडायनामिक डिझाईन मुळे हे विमान ध्वनीच्या वेगाच्या पाचपट अधिक वेगाने जाऊ शकते. सध्या या विमानात १० प्रवासी प्रवास करू शकतील पण लवकरच १०० प्रवासी नेणारे असे विमान तयार होत असल्याचे सांगितले जात आहे.

चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार बोईंग ७३७ पेक्षा मोठ्या आकाराचे हे विमान असेल, त्यातून १०० प्रवासी प्रवास करू शकतील. प्रोटोटाईप विमानाचे डेव्हलपर्स टेस्टिंग सुरु असून हायपरफॉरमन्स अल्टीट्युड मध्ये या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तेथे विमानाला ध्वनीच्या वेगाच्या सहापट अधिक वेग घेता आला आहे. पण या काळात विमान गरम झाल्याने त्याच्या प्रेशर हिट कंट्रोलवर काम सुरु आहे. या विमानामुळे जगात कुठल्याही ठिकाणी एका तासात पोहोचणे शक्य होणार आहे.