ब्रिटन पंतप्रधान जोन्सन सातव्यावेळी झाले पिता

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन वयाच्या ५७ व्या वर्षी पुन्हा पिता झाले असून त्यांचे हे सातवे अपत्य आहे. जोन्सन यांच्या पत्नी कॅरी यांनी गुरुवारी लंडन हॉस्पिटल मध्ये मुलीला जन्म दिला. पंतप्रधान आणि कॅरी या दोघांनी राष्ट्रीय सेवा स्वास्थ टीमला त्यांनी केलेल्या देखभाल आणि सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

वर्षीच्या सुरवातीलाच कॅरी यांनी जुलै मध्ये इन्स्टाग्रामवर त्या पहिल्या गर्भपातानंतर पुन्हा गरोदर असून नाताळच्या सुमारास घरी नवा पाहुणा येईल अशी माहिती दिली होती. या वर्षी मे महिन्यात वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल मध्ये या दोघांनी अतिशय साधेपणाने विवाह केला होता. विवाहातील वधू पोशाख कॅरी यांनी भाडेतत्वावर आणला होता आणि त्याची बरीच चर्चा झाली होती.

बोरिस यांचा हा तिसरा विवाह आहे. त्यांच्या माजी पत्नी भारतवंशी मरीना व्हीलर यांना चार मुले आहेत. मरीना यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यावर बोरिस यांचे आर्ट सल्लागार हेलेन मॅकिनटायर बरोबर अफेअर होते. त्या संबंधातून त्यांना एक मुलगा झाला आहे. त्यांची सर्वात पहिली पत्नी एलेग्रा यांना मुलबाळ झाले नव्हते असे समजते.