मोटोरोलाचा जी ५१, स्वस्त फाईव्ह जी स्मार्टफोन सादर

मोटोरोलाने त्याचा सर्वात स्वस्त फाईव्ह जी स्मार्टफोन मोटोरोला जी ५१ नावाने भारतीय बाजारात आणला आहे. या फोनच्या बेस व्हेरीयंटची म्हणजे ४ जीबी रॅम, ६४ जिबी स्टोरेजची किंमत १४९९९ रुपये आहे. १६ डिसेंबर पासून तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. अॅक्वा ब्लू, ब्राईट सिल्व्हर, इंडिगो ब्लू अश्या तीन रंगात तो उपलब्ध आहे.

या फोन सोबत दोन वर्षे  सिक्यूरीटी अपडेट मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ग्राहक हा फोन खरेदी करू शकतील. ग्राहकांना खरेदीसाठी काही खास ऑफर्स दिल्या गेल्या आहेत. एक्सिस बँक कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्के, आयसीआयसीआय, इंडसलंड बँक, एसबीआय कार्ड खरेदीवर २० टक्के सूट मिळणार आहे. तसेच ५२० रुपये प्रती महिना ईएमआय वर सुद्धा हा फोन खरेदी करता येणार आहे.

या फोनला ६.८ इंची फुल एचडी , आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड ११ ओएस, ट्रिपल कॅमेरा सेट आहे. प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असून ८ एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स, २ एमपीचे मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी साठी १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन साठी ५००० एमएएच ची बॅटरी २० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. सिंगल चार्ज मध्ये ती ३० तासाचा नॉनस्टॉप पॉवर सपोर्ट देईल असा कंपनीचा दावा आहे. फोन साठी ड्युअल फ्युचर रेडी ५ जी सिम सपोर्टसह दिले गेले आहे.