असा साजरा झाला पृथ्वी अंबानी याचा पहिला वाढदिवस
आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती, रिलायंस समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा पहिला नातू पृथ्वी १० डिसेंबर रोजी १ वर्षाचा झाला असून त्याचा हा पहिला वाढदिवस मोठ्या थाटाने जामनगर येथील रिसोर्ट मध्ये साजरा केला गेला. या वाढदिवसाची तयारी पृथ्वीचे आईवडील आकाश आणि श्लोका यांनी अगोदरपासूनचा सुरु केली होती. नेदरलंड येथून खेळणी मागविली गेली होती. थायलंड आणि इटली मधील खास शेफ खास पदार्थ बनविण्यासाठी आले होते. मुंबई मधून चार्टर विमानाने वाढदिवसाचा केक मागविला गेला होता. गुजराथ मधून १०० ब्राह्मण पृथ्वीला आशीर्वाद देण्यासाठी बोलावले गेले होते. जामनगरच्या आसपासच्या गावातील ५० हजार गावकऱ्याना भोजन दिले गेले तर अनाथाश्रमातील मुलांसाठी खेळणी पाठविली गेली.
या वाढदिवसासाठी अनेक बड्या सेलेब्रिटी आमंत्रित होत्या. त्यात सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्या बरोबरच रणबीर कपूर, अलीया भट्ट, दीपिका पदुकोन, रणवीरसिंग, अश्या अनेक सेलेब्रीटी होत्या. पाहुण्यांसाठी मुंबई हून खास चार्टर विमानांची सोय केली गेली होती. वाढदिवस निमंत्रण देताना करोना प्रोटोकॉलचा उल्लेख केला गेला होता. येणाऱ्या पाहुण्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, मुंबई बाहेरून येणार्यांनी ७ डिसेंबर नंतरचा करोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट आणावा अश्या सूचना होत्या असे समजते. कम्प्लीट क्वारंटाइन बबल पार्टी असे या समारंभाचे वर्णन केले गेले.