थलसेना प्रमुख नरवणे होणार नवे सीडीएस?
चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिकाम्या झालेल्या सीडीएस पदावर लवकरच नवी नियुक्ती केली जात असून या पदासाठी तिन्ही दल प्रमुख स्पर्धेत आहेत. मात्र गेले १९ महिने चीन बरोबर लदाख भागात सुरु असलेला तणाव आणि या संदर्भात सर्वात अधिक अनुभव असलेले थलसेना प्रमुख एम एम नरवणे याची नियुक्ती या पदावर केली जाईल असे अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे अत्यंत महत्वाचे पद असून ते फार काळ रिकामे ठेवले जाणार नाही असेही समजते.
रावत यांच्या मृत्युनंतर गुरुवारी तिन्ही सेना दलातील वरिष्ठ कमांडर यांचा नावाने एक समिती नेमली गेली असून येत्या दोन तीन दिवसात त्यांच्या शिफारसीवरून एक पॅनल या निवडीला अंतिम रूप देणार आहे आणि मग स्वीकृतीसाठी ते रक्षा मंत्री राजनाथसिंग यांच्या कडे पाठविले जाणार आहे. त्यानंतर विशेष कॅबिनेट समिती कडे ते पाठविले जाईल आणि ही समिती तिन्ही सेना दल प्रमुख निवडीसाठी जे प्रोटोकॉल आहेत तेच वापरून सीडीएस निवडीची प्रक्रिया पूर्ण करेल असे समजते.
चीफ ऑफ आर्मी स्टाफ हेच कमिटीचे अध्यक्ष असतात आणि त्यात तिन्ही सेनादल प्रमुख सामील असतात. या पदासाठी जनरल मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे. ते एप्रिल मध्ये सध्याच्या पदावरून निवृत्त होणार आहेत. शिवाय ते हवाई दल आणि नौदल सेना प्रमुखांना वरिष्ठ आहेत. बिपीन रावत यांचा कार्यकाल २०२३ मध्ये संपणार होता. सीडीएस साठी निवूत्तीचे वय ६५ वर्षे आहे. यामुळे नरवणे पूर्ण तीन वर्षे या पदावर काम करू शकणार आहेत. सेना प्रमुखांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. नरवणे यांची सीडीएस पदी नियुक्ती झाली तर त्यांच्या जागी थलसेना प्रमुख म्हणून सी पी मोहंती यांची वर्णी लागू शकेल अशी चर्चा आहे. कारण मोहंती यांचा प्रत्यक्ष एलएसी (लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल) कामाचा अनुभव मोठा आहे.