सीडीएस बिपीन रावत यांनी राखली होती घराण्याची सैन्य परंपरा
देशाचे पहिले सीडीएस (तिन्ही दल प्रमुख) बिपीन रावत यांच्या घराण्यात असलेली सैन्य परंपरा त्यांनीही कायम राखली होती. त्यांचे आजोबा त्रिलोकसिंग रावत हे ब्रिटीश आर्मीमध्ये सुभेदार होते. वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मणसिंग रावत डेप्युटी आर्मी चीफ पदावर होते. बिपीन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी देशाचे पहिले सीडीएस म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांनी १ जानेवारी २०२०ल कार्यभार स्वीकारला होता.
१६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे बिपीन रावत यांचा जन्म झाला होता. वडील लष्करात असल्याने त्यांचे अनेक ठिकाणी शिक्षण झाले. लहानपणापासून बिपीन यांनी सैन्यात जाण्याचे ठरविले होते. त्यांच्या सैनिकी जीवनाची सुरवात आयएमए मधून झाली. प्रशिक्षण पूर्ण करून ते प्रथम १६ डिसेंबर १९७८ मध्ये गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियन मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून दाखल झाले होते. याच रेजिमेंट मध्ये त्यांचे वडीलही होते. १७ डिसेंबर २०१६ मध्ये रावत यांची आर्मी चिफ म्हणून निवड झाली. आणि जानेवारी २०२० मध्ये ते देशाचे पहिले सीडीएस बनले.
सीडीएस रावत यांना परमविशिष्ट सेवा मेडल, युध्द सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल सन्मानानी गौरविले गेले होते.