या स्वेटरसाठी मोजावे लागणार ३० लाख रुपये

नाताळची चाहूल आता लागली आहे आणि त्यानिमित्ताने काय नवीन वस्तू खरेदी करायच्या याचे बेत सुरु झाले आहेत. काही खास खरेदी करण्याचा विचार असलेल्यांसाठी एक खास स्वेटर सेल साठी उपलब्ध केला गेला आहे. या क्रिसमस जंपर स्वेटरची किंमत ३० हजार युरो म्हणजे ३० लाख रुपये आहे. जगातील हा सर्वात महाग स्वेटर ठरला असून अतिशय मेहनतीने तो बनविला गेला आहे.

या स्वेटरवर महाग रत्ने जडविली गेली आहेत. या स्वेटरच्या विक्रीतून येणारा पैसा नॅशनल हेल्थ सर्विसला देणगी म्हणून दिला जाणार आहे. हा स्वेटर बनविण्यास ३००० तास लागले आहेत. ३३ वर्षीय आर्टिस्ट एडेन लिबन याने तो बनविला आहे. त्यासाठी त्याने त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी म्हणजे ७ लाख रुपये खर्च केले आहेत. या स्वेटरवर रेनडीअर विणला गेला असून त्याला हिरे एनक्रेस्टेड सिल्व्हर स्टार्सने सजविले गेले आहे.

इटालियन सिल्कवर २४ कॅरेट सोन्याच्या धाग्याचा वापर करून विणकाम केले गेले आहे. हजारो स्वारोस्की क्रिस्टल्स या जंपरवर जडविले गेले आहेत. या स्वेटर अतिशय मुलायम आणि चमकदार आहे. यापूर्वी बनविला गेलेला महाग जंपर टिप्सी एल्ब्स यांनी बनविला होता आणि त्याची किंमत होती २५ लाख रुपये. एडन याला २०२० मध्ये असा जंपर बनविण्याची कल्पना सुचली आणि त्याने तो हाताने तयार केला. डिसेंबर २०२० मध्ये त्याने हे काम सुरु केले ते नोव्हेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे.