अशी आहेत रशियन एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर
भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा अन्य १२ जणांसह तमिळनाडू मधील कुन्नूर जिल्हात एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा ही हेलिकॉप्टर चर्चेत आली आहेत. भारताने रशियाकडून ही हेलिकॉप्टर खरेदी केली असून ही बहुपयोगी आहेत. २००८ मध्ये प्रथम भारताने १०३ कोटी डॉलर्स खर्चून अशी ८० हेलिकॉप्टर मिळविली होती त्यानंतर या हेलिकॉप्टरची खरेदी भारताने सुरूच ठेवली आहे. भारतीय लष्कराकडे सध्या अशी २२० हेलिकॉप्टर आहेत.
हे हेलिकॉप्टर जमिनीवरील शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता असलेले आहे. भारतीय वायुसेना नैसर्गिक संकटात या हेलिकॉप्टरचा वापर करते. एमआय १७ व्ही पाच, सेनेसाठी युटीलीटी ट्रान्सपोर्टचे काम करते. २०१२ मध्ये प्रथम ते सेनेत कमिशन झाले होते आणि त्यांनी एमआय ८ हेलिकॉप्टरची जागा घेतली होती. हे हेलिकॉप्टर अतिशय भरोसेमंद आहे असे तज्ञ सांगतात. याचा वापर अनेक प्रकारे करता येतो. लोकांची वाहतूक, सैनिकी उपकरणे, शस्त्रे, दुर्गम भागात रसद पुरविणे, जखमीना त्वरित रुग्णालयात नेणे अश्या आवश्यक कामांबरोबर वेळ पडली तर त्याचा हल्ला करण्यासाठी सुद्धा वापर होतो.
या हेलिकॉप्टर मधून एस ८ रॉकेट, गन, ऑटो कॅनन, अँटी टँक मिसाईल, प्रिसिजन गायडेड शास्त्रे वापरता येतात. जगात अशी १५ हजार हेलिकॉप्टर ६० हून अधिक देशात वापरली जात आहेत. या हेलिकॉप्टरचा वेग ताशी २५० किमी असून त्याची उड्डाण क्षमता ८०० किमी आहे. ६ हजार फुट उंचीवरून ते उडू शकते आणि एकावेळी २४ माणसाना यातून प्रवास करता येतो. दोन पायलट आणि एक कृ इंजिनीअर हे हेलिकॉप्टर उडवितात.
१२ स्ट्रेचर्स, ४ हजार किलो सामान, ५ हजार किलो वजन वाहून नेऊ शकणारे हे हेलिकॉप्टर ६० फुट लांब आणि १८ फुट रुंदीचे आहे. या हेलिकॉप्टरचे वजन ११,१०० किलो आहे.