विक्की कतरिना विवाह व्हिडीओ साठी ओटीटी प्लॅटफॉर्म कडून १०० कोटींची ऑफर

बॉलीवूड सेलेब्रिटी कतरिना कैफ आणि विक्की कौशल ९ डिसेंबर रोजी सवाई माधोपुर येथे खास हॉटेल मध्ये विवाहबद्ध होत आहेत. त्यांच्या विवाहाचे फोटो आणि व्हीडीओ घेण्यासाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्म कडून १०० कोटींची ऑफर दिली गेली आहे. ही ऑफर कतरिना विक्की यांनी स्वीकारली असेल तर एखाद्या फिचर फिल्म प्रमाणे हा विवाह सोहळा त्यांचे चाहते पाहू शकणार आहेत. त्यात विवाहाचे सर्व कार्यक्रम असतीलच पण कुटुंबियांच्या मुलाखती सुद्धा दिसणार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मला यातून कोट्यावधीची कमाई होईलच शिवाय त्यांच्या प्रेक्षकवर्ग वाढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे.

पिंक व्हिला मधील बातमीनुसार परदेशात हा ट्रेंड पूर्वीच रुळला असून आता भारतात तो रुळविण्याचा प्रयत्न होत आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव जाहीर केले गेलेले नाही. परदेशात अनेक सेलेब्रीटी अश्या ऑफर्स स्वीकारतात. तेथे हा प्रकार आता अगदी कॉमन आहे. २०१८ मध्ये विवाह केलेल्या दीपिका आणि रणवीरसिंग यानाही त्यांच्या विवाहाचे चित्रीकरण करण्यासाठी अशीच ऑफर दिली गेली होती मात्र त्यांनी या ऑफरला नकार दिला होता. कतरिना आणि विक्की यांचा विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे.