आत्महत्या करायचीय? हे मशीन देईल एक मिनिटात मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी किमान ७ लाख आत्महत्या होतात तर करोडो नागरिक आत्महत्येचा प्रयत्न करतात. यातही १५ ते १९ वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या रोखण्यासाठी अनेकविध उपाय केले जात आहेत. आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजण्याचे प्रयत्न सातत्याने जगभर होत आहेत. मात्र असाही एक देश आहे जेथे आत्महत्या कायदेशीर आहे. आता तर या देशाने एका मिनिटात वेदनारहित मृत्यू देणाऱ्या मशीनला मंजुरी दिली आहे.
या देशाचे नाव आहे स्वित्झर्लंड. येथे असे एक मशीन तयार केले गेले आहे, ज्यात आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला १ मिनिटाच्या आत मृत्यू येईल. मृत्यू येताना अजिबात वेदना होऊ नयेत अश्या प्रकारे या मशीनचे डिझाईन केले गेले आहे. ताबूत च्या आकाराचे हे मशीन खास तंत्रज्ञान वापरून बनविले गेले आहे.
विशेष म्हणजे डॉ. डेथ अशी ओळख असलेल्या डॉ. फिलीप नित्स्चेक यांनी हे मशीन तयार केले आहे. ते एका एनजीओचे संचालक सुद्धा आहेत. त्यांनी तयार केलेल्या मशीनमध्ये झोपलेली व्यक्ती स्वतः मृत्यूचे नियंत्रण करू शकते. म्हणजे आता आपण मरायचे असे नक्की ठरले कि या व्यक्तीने एक बटण दाबायचे आहे. त्यामुळे ऑक्सिजनची लेवल एकदम कमी होते आणि क्षणात संबंधित व्यक्तीला मृत्यू येतो.
स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला कायदेशीर मान्यता आहे. इतकेच नव्हे तर ज्याला आत्महत्या करायची आहे तो त्यासाठी दुसऱ्याची मदत सुद्धा घेऊ शकतो. याला असिस्टेड सुसाईड म्हणतात. नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘सार्को’ नावाच्या या मशीनमुळे दुसर्याची मदत घेण्याचे वेळ येणार नाही. पुढच्या वर्षात हे मशीन अॅक्टीव्ह होणार आहे असे सांगितले जात आहे.