काल दिवसभरात 6 हजार 822 कोरोनाबाधितांची नोंद, तर 220 रुग्णांचा मृत्यु


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाचा कहर अद्याप देशात सुरुच आहे. त्यातच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली आहे. काल दिवसभरात देशात 6 हजार 822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 220 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 23 रुग्ण सापडले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या सध्या देशात 95 हजार 14 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 73 हजार 757 झाली आहे. ओरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 10 हजार 4 कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे देशात आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 79 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 128 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 79 लाख 39 हजार 38 डोस देण्यात आले. आतापर्यंत 128 कोटी 76 लाख 10 हजार 590 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.