सुकेश चंद्रशेखरच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला अटक होण्याची शक्यता


मुंबई – दिवसेंदिवस अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. जॅकलीनला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर सुकेश चंद्रशेखरच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे देश सोडण्यापासून रोखण्यात आले. ईडीने तिला मुंबई विमानतळावर थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले आहे. इडीकडून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी होणार आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा सुकेश चंद्रशेखरवर आरोप आहे.

दरम्यान या गंभीर संकटातून बाहेर काढण्यास तिला बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच तिचा जवळचा मित्र आणि गुरू सलमान खान मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सलमान खानची मदतही जॅकलीनला फायदेशीर ठरणार नसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लवकरच ‘जॅकलीनला अटक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रकरणात तिचे नाव आल्यानंतर आता तिच्या जवळच्या मित्रपरिवारानेही तिची साथ सोडली आहे. तिचे सर्व जवळचे मित्र कठीण प्रसंगात गायब झाले आहेत. तिच्या मित्रपरिवाराने तिच्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

जॅकलिन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीकडून चौकशी होणार आहे. 8 डिसेंबर रोजी दिल्लीत जॅकलिनला हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरे जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातील अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.