रेडमी नोट ११ टी फाईव्ह जी चा आज सेल

शाओमीचा सबब्रांड रेडमीचा नोट ११ टी फाईव्ह जी स्मार्टफोनचा पहिला सेल आज म्हणजे ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता होत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा अमेझोनवर ग्राहक हा फोन खरेदी करू शकणार आहेत. तीन व्हायब्रंट कलर्स मध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा मिडरेंज फोन तीन व्हेरीयंट मध्ये मिळणार आहे.

६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज साठी १४९९९, १२८ जीबी स्टोरेज साठी १५९९९ तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज साठी १७९९९ अश्या याच्या किमती आहेत. या फोन साठी ६.६ इंची फुल एचडी डिस्प्ले, गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. ड्युअल स्पीकर, ड्युअल माईक सपोर्ट आहे, यामुळे कॉलिंग व मेसेज मध्ये अधिक सुरक्षा मिळणार आहे. ड्युअल रिअर कॅमेरा सेट अप मध्ये प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असून ८ एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स आहे. सेल्फी साठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करतो.

यात ८ जीबी रॅम व ३ जीबी बुस्टर फिचर आहे. यामुळे अधिकाधिक ११ जीबी रॅमला हा फोन सपोर्ट करू शकतो. ५००० एमएएचचे ३३ वॉट फास्ट चार्जिंग बॅटरी दिली गेली आहे. त्यामुळे फोन ६० मिनिटात पूर्ण चार्ज होतो.