काल दिवसभरात देशात 8 हजार 306 कोरोनाबाधितांची नोंद, तर 211 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात अद्याप कायम आहे. अशातच भारतातही जगाची धास्ती वाढवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सध्या देशात ओमिक्रॉनचे 21 रुग्ण आहेत. अशातच देशात काल (रविवार) दिवसभरात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 211 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 98 हजार 416 आहे. तसेच या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 73 हजार 537 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (रविवारी) 8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 127 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (रविवारी) 24 लाख 55 हजार 911 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीचे 127 कोटी 93 लाख 9 हजार 669 डोस देण्यात आले आहेत.