बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाईंची पुन्हा एंट्री


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला बिग बॉस मराठीचे तिसरे सिझन आले आहे. शोमधील सहभागी स्पर्धकांमध्ये सतत भांडणे आणि वाद होतच असतात. अशातच आता बिग बॉसच्या घरातून जे स्पर्धक बाहेर पडले त्यांची पुन्हा एण्ट्री होणार आहे. तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्यचा यामध्ये समावेश आहे. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे, हे या तिघांनी सांगितले. स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रू अनावर झाले.


तृप्ती देसाई म्हणाल्या, विशाल एकदम मस्त… मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केलास ना, वन मॅन आर्मी. मी पहिल्यापासून जे सांगत होते, कुठे तरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही! लंबी रेस का घोडा है तू! मस्त एकदम आणि मी सगळ्यांना सांगितले की, सगळ्यात छान मन आमच्या विशालचे आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचे कधी नसते.

तर दुसरीकडे जयवर स्नेहाने गंभीर आरोप केले. त्यानंतर जय भावूक झालेला दिसत आहे. यावेळी त्याला उत्कर्ष आणि मीरा समजावताना दिसत आहेत. मीरा जयला हा टास्कचा एक भाग आहे वाईट वाटून नको घेऊ, असे सांगताना दिसत आहेत. दरम्यान, यानंतर आता हे तीन नवीन सदस्य अजून किती दिवस घरात राहणार? यादरम्यान काय काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.