पृथ्वीच्या भेटीला आलाय चमकदार हिरव्या रंगाचा धुमकेतू

खगोलतज्ञ आणि स्टार गेझर्स यांच्या नजरा सध्या एका विशेष पाहुण्याच्या दर्शनावर खिळलेल्या आहेत. १२ डिसेंबरपासून चकमदार हिरव्या रंगाचा एक धुमकेतू पृथ्वीच्या जवळ येत आहे. आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान म्हणजे एरीजचे वरिष्ठ खगोलतज्ञ डॉ. शशीभूषण पांडेय यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर अॅस्ट्रोफोटोग्राफर राजीव दुबे यांनी हिमालय प्रवासात रात्री दोन च्या सुमारास या हिरव्या धूमकेतूचे सुंदर फोटो टिपले आहेत.

या धूमकेतूचे नाव सी २०२१ लिओनार्ड असे असून याच वर्षात खगोलतज्ञ जीई लीयोनार्द यांनी हा धुमकेतू शोधला आहे. ३ जानेवारी २०२० मध्ये त्यांनी प्रथम हा धुमकेतू पाहिला होता. आता या ३ जानेवारीला तो अधिक स्पष्ट दिसेल,१२ जानेवारीला पृथ्वीच्या अगदी येईल आणि १८ जानेवारीला शुक्र ताऱ्याजवळ  येणार आहे. तो वेगाने सूर्याच्या जवळ जात असून सूर्याजवळ जाताच त्यांची शेपटी लांब होणार आहे. हा धुमकेतू दुर्बिणीतून पाहता येईल.

डॉ. पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार धुमकेतू हे आपल्या सौरमंडळातील  सदस्य आहेत आणि अन्य ग्रहांप्रमाणे ते सूर्याला प्रदक्षिणा घालतात. ते बर्फाचे बनले असल्याने सूर्यकिरणे त्यांच्यावर पडली कि चमकदार दिसतात. सूर्याजवळ गेले कि यांच्या शेपटीची लांबी वाढते. धुमकेतू पृथ्वीजवळ उल्कांचे भांडार सोडतात. पृथ्वी जेव्हा या मार्गातून जाते तेव्हा या उल्का जळतात यालाच आपण तारा तुटला असे म्हणतो.