गुगलचे डूडल मधून पिझ्झा डे सेलेब्रेशन

गुगलचे आजचे डूडल एकमेवाद्वितीय असून जगभरात सर्वात लोकप्रिय पदार्थ ठरलेल्या पिझ्झाचे पिझ्झा डे सेलेब्रेशन त्यातून केले गेले आहे. २००७ मध्ये आजच्या दिवशी युनेस्कोने प्रतिनिधी यादीत निपोलीयन पिझ्झाउलो बनविण्याचा विधी सामील केला होता. या निमित्ताने गुगलने एक कोडे घातले असून जगभरातील ११ सर्वात लोकप्रिय टॉपिंग पिझ्झा, युजर्सनी पिझ्झा कुठल्या प्रकारचा आहे ते ठरवून त्यानुसार त्याचे स्लाईस करायचे आहेत. स्लाईस जेवढा अचूक कापला जाईल तेवढे जास्त स्टार युजर्सना मिळणार आहेत.

युजर्सने जे पिझ्झा कट करायचे आहेत, त्यात मार्गारिटा, पेपरोनी, व्हाईट, केला ब्रेसा, मुझारेला, हवाईयन, मेग्यूरोज, तेरियाकी, मेयोनीज, टॉम यम, पनीरटिक्का, मिठाई पिझ्झा यांचा समावेश आहे. इजिप्त पासून रोम पर्यंत प्राचीन संस्कृती मध्ये टॉपिंग्ससह फ्लॅटब्रेड खाण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. मात्र पिझ्झाचे जन्मस्थान म्हणून इटली मधील नेपल्स ओळखले जाते. १७०० मध्ये येथे पहिला पिझ्झा बनला. अर्थात आर्थिक भरभराट होत गेली तसा पिझ्झा बनविण्याची पद्धत बदलत गेली.

आकडेवारी सांगते आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी ५ अब्ज पिझ्झा फस्त केले जातात. युएस मध्ये प्रती सेकंदाला पिझ्झाचे ३५० स्लाईस संपतात. युनेस्को नुसार नियपोलीटन कला पिझाडओलो एक स्वयंपाक शास्त्र असून त्यात पीठ मळण्यापासून लाकडी ओव्हन मध्ये भाजण्यापर्यंत चार महत्वाच्या पायऱ्या अमलात आणल्या जातात.