कतरिना या बाबतीत विक्कीपेक्षा वरचढ

बॉलीवूड जगतात सध्या प्रचंड चर्चेत असलेली कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांची शादी आता अगदी निकट येऊन पोहोचली असून पाहुणे मंडळी विवाहस्थळी दाखल होऊ लागली आहेत. लग्नाची मेजवानी बनविण्यासाठी किती शेफ आलेत, किती पाहुण्यांना आमंत्रण आहे, कोणता महागडा स्यूट विक्की कतरिनाने बुक केला आहे, त्याचे एका रात्रीचे भाडे किती अशी अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर कतरिना कैफचा बॉलीवूडमधला प्रवास विशेष ठळकपणे समोर येतो आहे. चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली कतरिना आज बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने निवडलेला जोडीदार विक्की कौशल पेक्षा ती अनेक बाबतीत वरचढ आहे. कतरिनाने यश मिळविण्यासाठी खूप झुंज दिली आहे. बॉलीवूड मध्ये ती आली तेव्हा तिला हिंदी बोलताही येत नव्हते. तिचे बालपण परदेशात गेले असून तिचा जन्म सुद्धा परदेशात झाला आहे. बॉलीवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा कतरिना यशस्वी आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार कतरिना एका चित्रपटासाठी ११ कोटी रुपये मानधन घेते तर विक्की कौशलचे मानधन ३ ते चार कोटी आहे. विक्कीच्या करियरची अजून सुरवात आहे तर कतरिनाला बॉलीवूड मध्ये येऊन २१वर्षे झाली आहेत. विक्कीपेक्षा कतरिना वयाने मोठी आहे आणि पैशानेही. कतरिनाची एकूण मालमत्ता २०० कोटींची आहे आणि वर्षाची सरासरी कमाई आहे २४ कोटींपेक्षा जास्त. तरीही कतरिनाने स्वतःचे घर घेतलेले नाही.

विक्कीची मालमत्ता २२ कोटींची आहे. फोर्ब्स मासिकानुसार २०१७ पासून सलग तीन वर्षे कतरिना जगात १०० हायेस्ट पेड सेलेब्रिटी मध्ये सामील होती. आज तिचे वास्तव्य भाड्याच्या घरात असून त्यासाठी लाखो रुपये भाडे भरले जाते. कतरिनाला अलिशान कार्सची आवड आहे. तिच्या संग्रही रेंजरोव्हर, मर्सिडीज, ऑडी क्यू अश्या कार्स आहेत मात्र बहुतेक वेळा तिला रेंज रोव्हर मधेच पाहिले गेले आहे. कतरिना चित्रपटाबरोबरच जाहिराती मधूनही खूप कमाई करते.