मोदी सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने टराटरा फाडला – सचिन सावंत


मुंबई – मोदी सरकारवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून महागाई, गरिबी, बेरोजगारी, पिण्याचे पाणी, स्वच्छतेसह मोदी सरकारच्या विविध योजनांच्या मुद्द्य्यावरून टीका केली आहे.


सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे निती आयोगाने मोदी सरकारच्या प्रपोगांडाचा व बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला असल्याचे म्हटले आहे. तसेच, १.देशातील ५८.५% जनता स्वयंपाक गॅसपासून वंचित, २. ५२% शौचालयादी स्वच्छतेपासून वंचित, ३. १४.६% पिण्याच्या पाण्यापासून वंचित, ४. ४५.६% घरांपासून वंचित, ५. ९.७% जनता बँक खात्यांपासून वंचित आहे अशी आकडेवारी देखील सचिन सावंत यांनी ट्विटसोबत दिली आहे.