ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा अॅक्शन प्लॅन समोर आला आहे. महानगरपालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. ठिकाणी जर याकोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास संबंधित संस्थांना 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.

10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हाय रिस्क देशांतून 3 हजार 136 प्रवासी सध्या देथात आले आहेत. त्यातील 2 हजार 149 प्रवाशांची कोरोना चाचणी झाली आहे. तर त्याच्यांपैकी 10 प्रवासी हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

काय आहे मुंबई महानगरपालिकेचा अॅक्शन प्लॅन?

  • हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी एअरपोर्ट सीईओकडून आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार
  • प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती
  • मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉर रूमला आपात्कालीन कक्षाकडून ती यादी प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार
  • प्रवाशांची सतत 7 दिवस वॉर रूममधून संपर्क ठेवण्यात येणार
  • प्रवासी विलगीकरणाचे नियम नीट पाळत आहे की नाही यांची खबरदारी घेतली जाणार
  • वॉर रूम प्रत्येक वॉर्डात 10 अॅम्ब्युलेंस तयार ठेवणार
  • यासाठी महापालिकेची पथकही बनवली जाणार
  • महापालिकेची पथक प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार
  • प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिले जाणार
  • पालिकेची प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर बारीक नजर असणार