कंगनाच्या कारवर पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा हल्ला


चंदीगड : शेतकऱ्यांचा विरोधाचा सामना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला करावा लागला. कथित शेतकऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या ताफ्याला श्री किरतपूर साहिबमधील बुंगा साहिब येथे घेराव घातला. यानंतर चंदीगड-उना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेतकरी आणि महिलांची माफी कंगनाने मागावी, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. आमच्या महिलांची कंगनाने माफी मागावी. त्यानंतरच तिला येथून जाऊ देऊ, असे आंदोलक म्हणत होते. शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

कंगनाची गाडी शेतकऱ्यांनी रोपड शहराजवळच्या बुंगा साहिबमध्ये अडवली. कंगनाला चंदीगड विमानतळावरून मुंबईची फ्लाइट पकडायची होती. शेतकऱ्यांसह महिलाही येथे उपस्थित होत्या आणि कंगनाने माफी मागावी अशी त्यांची मागणी होती. १०० रुपये देऊन महिलांना आंदोलनासाठी आणले जात आहे. तसेच आंदोलन करणारे हे खलिस्तानी अतिरेकी असल्याचे कंगना म्हणाली होती.

हिमाचल प्रदेशातून मी निघाले. पंजाबमध्ये येताच आपल्याला जमावाने घेरले. ते शेतकरी असल्याचं सांगत होते. शिवीगाळ करत होते. जीवे मारण्याची धमकी देत होते. देशात अशा प्रकारे मॉब लिंचिंग होत आहे. आमच्यासोबत सुरक्षा रक्षक नसते, तर काय स्थिती झाली असती? मोठ्या संख्येत पोलीस आहेत. तरीही जाऊ दिले जात नाही. मी कोणी राजकीय नेता आहे का? अनेक जण आपल्याविरोधात राजकारण करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. जमावाने आपल्याला घेरले आहे आणि पोलीस नसते तर आतापर्यंत माझी मॉब लिंचिंग झाली असती, असे कंगनाने म्हटले आहे.