लवकरच येतेय स्वदेशी कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रुझर बाईक

भारतीय कंपनी कोमाकी इलेक्ट्रिकल व्हेईकल त्यांच्या मोटरसायकल लाईन अप मध्ये इलेक्ट्रिक क्रुझरचा समावेश करत असून हि पहिली देशी इलेक्ट्रिक क्रुझर बाईक जानेवारी २०२२ मध्ये लाँच केली जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन सेग्मेंट मध्ये नवा ऑप्शन ग्राहकांना मिळणार आहे. उत्तर फीचर्स असलेल्या या बाईकची पहिली झलक अजून दिसलेली नाही. पण रिपोर्ट नुसार स्पोर्टी आणि स्टायलिश लुक मध्ये ही क्रुझर बाईक येत आहे.

या क्रुझर बाईकला एलईडी हेडलाईट आणि टेललाईट, क्रुझ कंट्रोल, रिपेअर स्वीच, रिव्हर्स स्विच, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हिटी, अॅडव्हांस ब्रेकिंग सिस्टीम व अन्य शानदार फीचर्स दिली गेली आहेत. तिला ४ किलो वॅटचा बॅटरी पॅक दिला गेला असून देशातील इलक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट मध्ये हा सर्वात मोठा आहे. बाईकला पॉवरफुल ५००० वॉट मोटर असून सिंगल चार्ज मध्ये ही बाईक २५० किमी अंतर कापू शकणार आहे.

कोमाकीचे इलेक्ट्रिक विभाग प्रमुख गुंजन मल्होत्रा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, कंपनीने चार इलेक्ट्रिक बाईक सादर केल्या आहेत पण आगामी क्रुझरवर आम्ही मोठी भिस्त ठेवली आहे. यात दोन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले गेले आहे. पहिले म्हणजे ही क्रुझर ग्राहकाला सहज परवडणारी असेल आणि दुसरे म्हणजे ती सहज उपलब्ध असेल. आम्ही दीर्घ काळ या बाईकवर काम करतो आहोत. ग्राहकाच्या रोजच्या गरजा पूर्ण करणे या त्यामागचा उद्देश आहेच पण उपयुक्त सेग्मेंट मध्ये लेझर मागणी पूर्ण करण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे. या बाईकसाठी अनेक राज्यांनी सबसिडी योजना जाहीर केल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.