आगामी आयफोन एसई ३ मिळणार ३० हजारापेक्षा कमी किमतीत
अॅपल लवकरच ग्राहकाला सहज परवडणाऱ्या किमतीत त्यांचा आगामी आयफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. आयफोन एसई ३, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत आणि अगदी अचूक सांगायचे तर मार्च २०२२ च्या अखेरी बाजारात आणत असल्याची खबर आहे. एसई सिरीज मधले हे थर्ड जनरेशन मॉडेल असेल.
ट्रेंड फोर्सच्या रिपोर्ट नुसार हा फोन बाजारात येताच अॅपलचा मार्केट शेअर जोरदार वाढेल असे संकेत मिळत आहेत. या फोनची किंमत एसई प्रमाणेच साधारण २९८९१ रुपयाच्या दरम्यान असेल. या फोनला नवीन चीपसेट सपोर्ट ए १५ बायोनिकसह असेल आणि तो फाईव्ह जी सपोर्ट करेल.
फोनचे डिझाईन एक्सआर प्रमाणेच असेल. त्याला ४.७ इंची एलसीडी डिस्प्ले दिला जाईल आणि बॉडी अल्युमिनियमची असेल. टच आयडी सेन्सर, होम बटण असेल तसेच रिअरला ड्युअल कॅमेरा सेट आणि फ्रंटला सिंगल सेल्फी कॅमेरा दिला जाईल.