एका महिन्यात व्हॉट्सअॅपने बंद केली 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सची खाती


सोशल मीडियात येणाऱ्या खोट्या आणि बनावट बातम्यांमुळे शांतता भंग होत असल्यामुळे आता व्हॉट्सअॅप अलर्ट झाले आहे. त्यासाठी सातत्याने कठोर पावले उचलली जात आहेत. याच दरम्यान, ऑक्टोंबर महिन्यात 20 लाखांहून अकाउंट्स फेसबुकच्या मालकी हक्काचे असलेल्या व्हॉट्सअॅपने बंद केले आहेत. यामागे काही कारणे सुद्धा आहेत.

नव्या आयटी नियमांचे पालन करण्यास व्हॉट्सअॅपने सुरुवात केली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपला सब्सक्राइबर्सकडून 500 तक्रारी आल्या आहेत. एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, ऑक्टोंबर महिन्यात प्लॅटफॉर्मवरील 2,069,000 भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअॅपचे असे म्हणणे आहे की, भारतीय युजर्सच्या खात्याची ओळख ही +91 फोन क्रमांकाच्या माध्यमातून केली जाते.

रिपोर्टमध्ये असे देखील सांगितले गेले आहे की, End-to-End Encrypted Messaging Service चा गैरवापर थांबवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये व्हॉट्सअॅप सर्वाधिक पुढे आहे. सातत्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये कंपनीने गुंतवणूक केली आहे. त्याचसोबत कंपनीने दुसऱ्या आर्ट टेक्नॉलॉजी, डेटा साइंटिस्ट्स आणि एक्सपर्ट्समध्ये ही गुंतवणूक केली आहे. युजर्सला पूर्णपणे सुरक्षितता देणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

तुम्ही आता व्हॉट्सअॅपद्वारे डीमॅट खाते उघडू शकता आणि व्हॉट्सअॅपच्या डीमॅट खात्यातून आयपीओमध्येही गुंतवणूक करू शकता. इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार व्हॉट्सअॅप चॅट विंडोद्वारे आयपीओसाठी अर्ज करू शकतात.