रस्ता आणि रुळावरून धावू शकणारे पहिले वाहन जपानमध्ये तयार

रस्ता आणि रूळ अश्या दोन्ही मार्गावरून सारख्याच क्षमतेने धावू शकणारे दुहेरी वाहन जपानमध्ये तयार झाले असून हे वाहन म्हणजे एक बस आहे. जगातील या प्रकारचे हे पहिलेच वाहन असून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान ते सुरु होणार होते मात्र आता नाताळच्या दिवशी त्यांचे उद्घाटन केले जात आहे. हे वाहन म्हणजे प्रवासी बस असून तिची चाचणी यशस्वी झाली आहे. दोन राज्यांदरम्यान या बसच्या फेऱ्या सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. जपानी कंपनी एसा सिसाई रेल्वे या बसचे संचालन करणार आहे.

ही बस सुरवातीला केईओ, तोकुमिशा, मुरोतो, कोची या शहरादरम्यान चालविली जाणार आहे. त्यासाठीचा प्रवास मार्ग अश्या पद्धतीने आखला गेला आहे कि ज्यात रस्ता मार्ग सुद्धा आहे आणि रूळ मार्ग सुद्धा आहे. शिकोकू पासून ही बस सुटेल. एकूण १६ किमी मार्गापैकी ६ किमी रस्ता आणि १० किमी रूळ असा हा मार्ग आहे. त्यासाठी बसच्या मायक्रोबेस मध्ये सुधारणा केली गेली आहे. या बसची चाके रेल्वे रुळावर चालू शकतील अशी आहेत पण रुळावरून रस्त्यावर आणताना हि चाके वर उचलली जातील आणि सामान्य टायरच्या मदतीने ही बस रस्त्यावर धावेल. या बसची प्रवासी क्षमता १८ सीटची आहे.

प्रवाशांना तिकीट बुक करूनच यातून प्रवास करता येणार असून ऑनलाईन बुकिंग सुविधा दिली गेली आहे. रोज ही बस १३ फेऱ्या मारणार आहे. जपानी सोशल मिडीयावर या बसचे फोटो आणि डेमो व्हायरल झाले असून नागरिकाच्या ते फारच पसंतीस उतरले आहेत असे त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.